शाळेविषयी माहिती :
आदर्श विद्या निकेतन शाळा, काशिगाव, मिरारोड
शाळेची ओळख :
श्री शिवशक्ती सेवा मंडळ काशीगांव या संस्थेची स्थापना सन 1984 साली झाली. संस्थेची ध्येय- धोरणे हि मुळातच समाजसेवा, शिक्षण ,आरोग्य हे घटक समोर ठेवून निश्चित करण्यात आली. संस्था सुरु झाल्यानंतर अनेक आरोग्य शिबीरे, वृक्षारोपण, सार्वजनिक विवाह सोहळे, सार्वजनिक गणेशोत्सव, गोपाळकाला, विविध क्रीडा स्पर्धा, गुणवंत गौरव सोहळा अशी अनेक सामाजिक कार्ये संस्थेने आयोजीत केली. हे करीत असतानाच जवळपासच्या परिसरात माध्यमिक शाळा नाही तसेच चेना, काजूपाडा या परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांचाही नेटाने विचार करीत शाळा सुरू करण्याचा विचार संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. केसरीनाथ डोंगरनाथ म्हात्रे यांनी केला. मनपा शाळेचे माजी मुख्याध्यापक ,आणि संस्थेचे उपाध्यक्ष स्व. बांदवडकर गुरुजी व संस्थेच्या सचिव सौ.स्वाती जोशी यांच्या सहकार्याने शाळेचा श्री गणेशा झाला.
“आदर्श विद्या निकेतन” या शाळेच्या स्थापनेने पदाधिकाऱ्यांनी पाहिलेल्या स्वप्नाला मूर्त स्वरूप आले. श्री शिवशक्ती सेवा मंडळाच्या माध्यमातून आदर्श विद्या निकेतन या शाळेचा प्रस्ताव सन 1997-98 मध्ये शासनाकडे सादर झाला. व सन 1999 साली शाळेला मान्यता मिळाली. त्यानुसार शाळेचे वर्ग बालवाडी, इयत्ता 1 ली ते 4 थी व इयत्ता 8 वी पासूनचे वर्ग सुरु करण्यात आले. शैक्षणिक वर्ष 2000-2001 पासून शाळेला नैसर्गिक वाढीने इयत्ता 10 वि च्या वर्गास परवानगी मिळून इंडेक्स नंबर प्राप्त झाला. अवघ्या काही विदयार्थ्यांसह 25 वर्षांपूर्वी सुरु झालेल्या विद्यालयात आज दीड हजाराहून अधिक विदयार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यालयातील अनेक गुणवंत शिक्षकांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आधुनिक प्रसार माध्यमातूनही आमच्या विद्यालयातील शिक्षक विदयार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. अनेक नामवंत माजी विदयार्थ्यांची परंपरा विद्यालयाला लाभली आहे.
शाळेची ध्येय आणि धोरणे :
- गुणवत्तापूर्ण शिक्षण : विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देणे.
- व्यक्तिमत्व विकास : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे.
- नैतिक मूल्ये : नैतिक मूल्ये आणि सद्गुणांचे शिक्षण देणे.
- स्वावलंबन : विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविणे.
- सामाजिक जबाबदारी : समाजातील जबाबदारीची जाणीव करुन देणे.
- सर्जनशीलता : विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि कल्पकता वाढविणे.
- शारीरिक स्वास्थ्य : शारीरिक आरोग्याची काळजी घेणे.
- सांस्कृतिक जाणीव : विद्यार्थ्यांना त्यांच्या सांस्कृतिक वारशाची माहिती देणे.
जेणेकरून, एक मजबूत, सर्वसमावेशक आणि न्याय्य शिक्षण प्रणाली तयार करून समाजातील सर्व, अगदी तळागाळातील विद्यार्थ्यांना ज्ञान संपादन करण्यास सक्षम बनविणे. विद्यार्थ्यांमधून स्वतंत्र, यशस्वी आणि जबाबदार भारताचे सुजाण नागरिक तयार करणे हे आमचे ध्येय आहे,
शाळेला प्राप्त पुरस्कार :
महापौर चषक - मिरा भाईंदर महानगरपालिका
२०१६
मिरा भाईंदर महानगरपालिका आयोजित विविध क्रिडा आणि सांस्कृतिक स्पर्धांमध्ये २०० पेक्षा जास्त सहभागी शाळांमधून वीस जास्तीतजास्त प्रथम क्रमांकांची पारितोषिके पटकावल्याबद्दल महापौर चषक प्रदान करण्यात आला.
संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान (मुंबई) आदर्श शाळा पुरस्कार
२०१३ – २०१४
संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान (मुंबई) यांच्याकडून आदर्श विद्या निकेतन शाळेस २०१३-२०१४ सालचा नैतिक शिक्षा योजना अंतर्गत विद्यार्थ्याना नैतिक शिक्षण देणे आणि विविध उपक्रम राबविल्याबद्दल आदर्श विद्यालय पुरस्कार देण्यात आला.
शिक्षण विभाग जिल्हा परिषद ठाणे आयोजित विज्ञान प्रदर्शन सहभाग पुरस्कार
२००५ – २००६
प्रकल्पाचे नाव : नदीजोड प्रकल्प – महापुराची पूर्वसूचना विद्यार्थी प्रकल्प
३४ वे ठाणे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन
२००८ – २००९
प्रकल्पाचे नाव : घरातील विजबचत करण्याचे तंत्र, तृतीय क्रमांक प्राप्त होऊन राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड.
३४ वे महाराष्ट्र राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन, चंद्रपूर (२००९) सहभाग प्रमाणपत्र
२००९
प्रकल्पाचे नाव : विजबचत करण्याचे तंत्र आणि उपाय
३८ वे ठाणे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व २५ वे शैक्षणिक साहित्य निर्मिती व ७ वे प्रायोगिक साधानांचे प्रदर्शन - शिक्षण विभाग जिल्हा परिषद (ठाणे)
२०१२ – २०१३
सहभाग प्रमाणपत्र : शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती
विषय : मनोरंजनातून शारीरिक शिक्षण व गणिती संकल्पनांचा विकास
४१ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन
२०१५ – २०१६
३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०१६, ठिकाण – विद्या प्रतिष्ठान (बारामती) येथे आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात सहभाग.
विषय : लोकसंख्या शिक्षण
शाळेत साजरे केले जाणारे उपक्रम आणि कार्यक्रम :
परिपाठ
शाळेमध्ये मराठी, इंग्रजी ,हिंदी भाषांमधून विद्यार्थी, संगीत वाद्यासह परिपाठ सादर करतात, दररोज वर्ग ३ ते ८ चे विद्यार्थी पाळी पाळींने परिपाठ सादर करतात.
क्रीडा स्पर्धा
शाळेमध्ये इंटर हाऊसेस स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यामध्ये देशी खेळ सोबतच मैदानी खेळ व आंतरराष्ट्रीय खेळ सुद्धा खे मिळविले जातात.
कृती युक्त पाढे पाठांतर
विद्यार्थ्यांना पाढे पाठ करण्याचा कंटाळा येऊ नये म्हणून कृतीयुक्त पाढे पाठ करण्यावर भर दिला जातो.
वाढदिवसानिमित्त शाळेत पुस्तक भेट देणे
शाळेमध्ये पूर्वी वाढदिवसानिमित्त मुले चॉकलेट वाटायची तो उपक्रम बंद करून वाढदिवसाच्या दिवशी शाळेत एक पुस्तक भेट देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
दररोज इंग्रजी वाक्य तयार करणे
विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची गोडी निर्माण व्हावी व भीती दूर होण्याकरिता दररोज एका प्रकारावर इंग्रजी वाक्य तयार करण्याचा उपक्रम परिपाठामध्ये घेतला जातो.
श्यामच्या आईचे क्रमशः वाचन
विद्यार्थ्यांना संस्काराचे मोल समजण्याकरिता श्यामची आई पुस्तकांमधील कथांचे दररोज क्रमशः वाचन घेतले जाते.
शैक्षणिक सहल
दरवर्षी विद्यार्थ्यांना निसर्गरम्य, ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याकरिता व माहिती मिळवण्याकरिता सहलीचे आयोजन केले जाते.
परिसरातील लघु उद्योगास भेट
कार्यानुभव विषयांतर्गत परिसरातील लघु उद्योगा विषयी माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी लघु उद्योगास भेट दिली जाते.
लता मंगेशकर गीतमंच
विद्यार्थ्यांना संगीत व कलेची आवड निर्माण व्हावी तसेच विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी लता मंगेशकर संगीत मंचाची स्थापना करण्यात आली आहे.
आमचे कला दालन
विद्यार्थ्यांनी वर्षभरामध्ये बनवलेल्या कार्यानुभव कला तसेच सण उत्सवा संबंधी वस्तूचे शाळेमध्ये निर्माण केलेल्या कलादालनामध्ये प्रदर्शन भरविण्यात येते.
विणकाम
कार्यानुभव मधील उत्पादक उत्प्रमांतर्गत विद्यार्थ्यांना बिनकामाचे धडे देऊन विविध विणकाम शिकविल्या जाते.
पेपर आर्ट
विविध पेपर पासून विविध आकार, वस्तु बनविण्यासाठी विद्यार्थ्यांना पेपर आर्टचे प्रशिक्षण दिले जाते.
बाल आनंद मेळावा
दरवर्षी 25 जानेवारीला बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते यामध्ये विद्यार्थी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून त्यामध्ये खरी कमाईचे महत्व विद्यार्थ्यांना समजावे यासाठी हा उपक्रम शाळेमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
सामान्य ज्ञानाची दहीहंडी
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान अध्यावत असणे आवश्यक आहे याकरिता शाळेमध्ये सामान्य ज्ञानाची दहीहंडी चे आयोजन करण्यात येऊन सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नांची स्पर्धा आयोजित केली जाते.
गोकुळाष्टमी
शाळेमध्ये दरवर्षी गोकुळाष्टमीला गोकुळाष्टमीचा उत्साह फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो शाळेतील निवडक मुले कृष्णा राधेच्या वेशामध्ये येऊन दहीहंडी फोडण्याचा व गोपाळकाल्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो.
मी वाचू शकतो
या उपक्रमांतर्गत शाळेमध्ये भिंतीवरील रंगरंगोटी काम केलेल्या बोलक्या भिंती वरील शालेय माहिती इंग्रजी व मराठी भाषेतून विद्यार्थी चांगल्या आत्मविश्वासाने वाचू शकतो.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
शाळेमध्ये शाळा स्तरावरील आयोजित होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा विषयीचे मार्गदर्शन कॅम्प आयोजित केले जाते यामध्ये नवोदय परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, मंथन परीक्षा,NMMS परिक्षा
रंगभरण स्पर्धा
विविध महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त रंगभरण स्पर्धांचे आयोजन व बक्षीस वितरण केले जाते.
विद्यार्थी बचत बँक
विद्यार्थ्यांना बचतीचे महत्त्व समजावे यासाठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची बचत बँक निर्माण करून विद्यार्थी स्वतः त्या बँकेमध्ये पैसे भरने, पैसे काढणे व हिशोब ठेवणे इत्यादी सर्व व्यवहार स्वतः करतात.
विविध कसरती साठी समर कॅम्प
विद्यार्थी शारीरिक दृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी जय बजरंग व्यायाम शाळा वाडेगाव व शाळेच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी सुट्टीमध्ये समर कॅम्प आयोजित केला जातो यामध्ये विद्यार्थ्यांना मल्लखांब , लाठी काठी व इतर कसरतीचे धडे दिले जातात.
शिक्षकवृंद आणि इतर कर्मचारी :
श्री. समाधान विठोबा सोर
- पद : मुख्याध्यापक
- शैक्षणिक पात्रता : एम.ए. बी.एड
छाया सुधाकर काळबांडे
- पद : सहाय्यक शिक्षिका
- शैक्षणिक पात्रता : B.A. DEd.
प्रणिता सुधाकरराव डंबाळे
- पद :सहाय्यक शिक्षिका
- शैक्षणिक पात्रता : M.A B. Ed.
अर्चना गोमाशे
- पद : सहाय्यक शिक्षिका
- शैक्षणिक पात्रता : B.A. DEd.
शाळेतील विविध कमिटी :
Mata palak
शाळेमध्ये शाळा स्तरावरील आयोजित होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा विषयीचे मार्गदर्शन कॅम्प आयोजित केले जाते यामध्ये नवोदय परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, मंथन परीक्षा,NMMS परिक्षा
kala shikshan
विविध महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त रंगभरण स्पर्धांचे आयोजन व बक्षीस वितरण केले जाते.
spoorts
विद्यार्थ्यांना बचतीचे महत्त्व समजावे यासाठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची बचत बँक निर्माण करून विद्यार्थी स्वतः त्या बँकेमध्ये पैसे भरने, पैसे काढणे व हिशोब ठेवणे इत्यादी सर्व व्यवहार स्वतः करतात.
test
विद्यार्थी शारीरिक दृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी जय बजरंग व्यायाम शाळा वाडेगाव व शाळेच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी सुट्टीमध्ये समर कॅम्प आयोजित केला जातो यामध्ये विद्यार्थ्यांना मल्लखांब , लाठी काठी व इतर कसरतीचे धडे दिले जातात.
